औरंगाबाद- सततचा दुष्काळ, नापिकी व कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी आत्महत्या करत असून, औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाडा विभागात शेतकरी आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल १४० हून अधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत १२ शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक १९ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या होत्या.
सततच्या
दुष्काळाने शेती व्यवसाय मोडकळीस आला असून, शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली आहे. कुटुंबाचा
उदरनिर्वाह, मुला-मुलींचे शिक्षण, मुलींचे लग्न
यासह शेतीसाठ लागणारा खर्च झेपेनासा झाल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकत
आहेत. त्यातच गेल्या वर्षभरात शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे वाढली असून, प्रशासनही या
आत्महत्यांना न्याय देण्यास समर्थ नसल्याचे दिसून येते.
यावर्षी
जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल १४० हून अधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. चालू डिसेंबर महिन्यात आतापर्यंत १२ शेतकर्यांनी
आत्महत्या केल्या आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यात तब्बल १९ शेतकर्यांनी
मृत्यूला कवटाळले. फेब्रुवारी महिन्यात १६, मार्च महिन्यात १५, सप्टेंबर महिन्यात १४ शेतकर्यांनी
आत्महत्या केल्या होत्या.















